नांदेड - प्रतिनिधी - शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथील सेवा सहकारी सोसायटी व साईदृष्टी नेत्रालय डॉक्टर लेन नांदेडच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्रतपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन सुनील रामदासी व सदस्य संतोष देशमुख शेळगांवकर यांनी दिली आहे.
या शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. एस. जी. घोडके हे रुग्णांची अत्याधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करणार असून अल्पदरात चष्मा देण्यात येणार आहे. तसेच काही रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन साई दृष्टी नेत्रालय, नांदेड येथे करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे सर. उपसरपंच सौ. शालीनीताई राजेन्द्र पा.शेळगांवकर, डॉ. दत्तात्रय यादवराव पाटील हे करणार आहेत.गावातील नेत्र रुग्नानी उपस्थित राहावे आसे आव्हान आयोजका तर्फे करण्यात आले आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शेळगांव (गौरी) ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सुनील रामदासी, सदस्य संतोष देशमुख, प्रकाश पा.शिंपाळे हे परिश्रम घेत आहेत.

COMMENTS