राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून सोमवार दि.9 ऑगस्ट रोजी स. 11वा. बिरसा क्रांती दलाच्या वतिने माहूर शहरातील बिरसा मुंडा चौकात बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संजय पेंदोर,भाजपाचे युवा नेते सुमित राठोड,शहराध्यक्ष गोपु महामुने यांचे हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले. आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा अमर रहे,आदिवासी समाज की जय च्या गर्जनेने जागतीक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा महीला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे, विजय आमले, ,वसंत कपाटे,अनिल वाघमारे,नंदकुमार जोशी,अनिल तोडसाम,राजु दराडे,विष्णू पेंदोर,संतोष तामखाने,अर्जुन मोहीते,संतोष वर्मा,नामदेव सोयाम,विनोद आडे,अखिलेश ऊके,अशोक जोशी,कैलास भालेराव,शुभम तोडसाम,शुभम हनवंते,गजानन गायकवाड,रवी तोडसाम,स्वप्नील मेश्राम,योगेश भालेराव,सुमित ईगळे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

COMMENTS