सोनपेठ/प्रतिनिधी
नवी मुंबईच्या रचनेत हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी योगदान दिले असून नवी मुंबई विमानतळाला हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे.आता क्रांतीदिनी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वसंत विचारधारा मंचच्या वतीने राजेश चव्हाण जालनेकर यांनी केले आहे.पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की,मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले असून आज अजगरासारखी वाढलेली मुंबई त्यातील गर्दी,अपुरे रस्ते,वाहनांची वाढती संख्या राहायला घरे न मिळणे दक्षिण मुंबईच्या चिंचोळ्या भौगोलिक भागात वाढ व्हायला जागा नसणे ही सगळी कारणे लक्षात घेऊन एक वेगळी नवी मुंबई असावी हा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी प्रगत आणि जगात वसलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईची निर्मिती केली.त्यात सिडको नावाचा भाग अत्यंत शिस्तबद्ध उभारण्याचा निर्णय नाईकांनी घेतला जवळजवळ ४८ वर्षांपूर्वी झालेला हा निर्णय नवी मुंबईची जन्मगाठ हे नाईकांचे स्वप्न डोळ्यासमोर आणून देणारे आहे.४८वर्षांपूर्वी विकास कामांसाठी किती कष्ट करावे लागत होते.याची कल्पनाही सध्या स्थितीत करवत नाही नवी मुंबई प्रस्तावित करण्याचा निर्णय प्रामुख्याने १९७२ झाली अमलात आणण्यास नाईकांनी मोठे योगदान दिले आहे.तत्पूर्वी वसंतराव नाईकांनी १९६४-६५ दरम्यान आपले योगदान दिले असून नवी मुंबई मध्ये होणाऱ्या विमानतळाला हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.मात्र या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्याचा प्रकार राज्यकर्त्यांच्या वतीने चालू असून ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मुंबई येथील मंत्रालयासमोर वसंत विचारधारा मंचच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वसंत विचारधारा मंच महाराष्ट्राचे प्रमुख राजेश चव्हाण जालनेकर यांनी केले आहे.दरम्यान या आंदोलनात बंजारा क्रांती दल,सर्व ओबीसी समाज बहुसंख्येने मुंबईमध्ये एकवटणार असल्याचे दिसते.

COMMENTS