सेलू : टोकीयो ऑलिंपिक 2020 मध्ये भारताच्या निरंजन चोप्रा यांनी 87:58 मिटर भालेफेकून भारतास सुवर्णपदक प्राप्त करून दिल्या बदल नूतन विद्यालयात पेढे वाटुन व फटाके फोडून आनंद उत्वस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, पर्यवेक्षक डी.डी सोन्नेकर,बाबासाहेब राखे, टेनिसव्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे,क्रीडा संघटक प्रंशात नाईक, बालासाहेब,सुधाकर रोकडे, शिक्षक सुनील तोडकर, कुशल कडे, संतोष क्षिरसागर,प्रतिक पटेल, उमेश क्षिरसागर, खेळाडू आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सुवर्णपदक विजयी निरंजन चोप्रा व सर्व भारतीयांच्या अभिनंदन केले. भारतातील क्रीडा सुविधा निर्मितीत वाढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली, नगरपालिका वतीने सेलू शहरात भव्य तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे यांची माहिती दिली.
माजी नगराध्यक्ष चव्हाण यांनी सर्व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व म्हणाले की निरंजन चोप्रा यास एका क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केल्या मुळे त्यांनी आज आपल्या भारत देशाचा ध्वज टोकीयो2020 मध्ये उंचावला.

COMMENTS