*राम दातीर*
माहूर (प्रतिनिधी )किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामाच्या अनुषंगाने आ.भीमराव केराम यांनी दिल्लीत महामार्ग मंत्री नितीन गडकरी,आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा,अर्थ राज्यमंत्री भागवत कराड,पर्यटन राज्यमंत्री किसन रेड्डी व जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंग कुलस्ते यांची भेट घेतली. या भेटीत पर्यटन राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी माहूरगड,उनकेश्वर व सहस्त्रकुंडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली नसल्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय रस्ते विकास निधीतून सारखणी,मांडवी,तलाईगुडा या रस्त्याला परवानगी देण्याच्या मागणीसह निधी अभावी गोकुंदा-मांडवा-घोगरवाडी या नांदेड-चंद्रपुर व आदिलाबादला जोडणा-या सीमा मार्गाचे काम रखडले असून त्यास मान्यता दिल्यास किनवट/माहूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे वास्तव नितीन गडकरी यांना आ.भीमराव केराम यांना दिलेल्या निवेदनात मांडले आहे.आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची खात्री देवून एकलव्य विद्यालयाचा पाठपुरावा करण्याची त्यांना सूचना केली. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही माहूरगड,उनकेश्वर व सहस्त्रकुंडच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे अभीवचन दिले आहे. आ.भीमराव केराम यांच्या दिल्ली भेटीने किनवट/माहूर मतदारसंघातील नागरिकांच्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या आहेत.

COMMENTS