महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे लोकांचे खूप नुकसान झाले.चिपळूण व महाड येथील अनेकांची घरे व संसार उध्वस्त झाले, याठिकाणी असलेल्या नाविकाना व त्यांच्या कुटुंबियांना नूसीच्या कार्यकर्त्यांच्या टीमने चिपळूण, गोवलकोट, मुराडपूर, मांजरेकाशी, महाड, राजेवाडी, मखजन, कसबा आणि फंसावणे येथे प्रत्यक्ष जाऊन मदत केली आहे.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून १० ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांना नुसीचे जनरल सेक्रेटरी अब्दुल गणी सारंग यांनी नूसीतर्फे दहा लाखाची मदत मुख्यमंत्री साहय्य निधीस सुपूर्द केली. त्याप्रसंगी नुसीचे अध्यक्ष कॅप्टन हिरानंदानी, असिस्टंट जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर, ऑफिस सेक्रेटरी सलीम झगडे उपस्थित होते.
नुसीच्या कल्याणकारी योजनेतून गरजू नाविकाना सतत मदत कार्य चालू असते.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS