सोनपेठ दि.९ (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कार्याध्यक्ष कालीदास आपेट यांच्या उपस्थितीत पार पडली .
परभणी जिल्हा शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात दि.९ रोजी दुपारी पार पडली .यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या वर चर्चा करण्यात आली. पिक विमा,पिक कर्ज ,नुकसान या बाबत शेतकऱ्यांनी तक्रारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या . या वेळी पिक विमा आंदोलन करुन शेतकऱ्यांना पिक विमा मिळवुन दिल्या बद्दल विश्वंभर गोरवे यांचा सत्कार करण्यात आला . या वेळी बोलतांंना कालीदास आपेट यांनी शेतकरी स्वातंत्र्य व उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हा एक कलमी कार्यक्रम यावरच शेतकरी चळवळ कायम राहावी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनुषंगिक कामे तर करावीच पण शेतकरी स्वातंत्र्य हेच केंद्र स्थानी ठेवावे असे आवाहान केले . शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वंभर गोरवे यांनी प्रास्ताविक केले .यावेळी अमृत शिंदे,बंडु सोळंके माऊली कदम, अनुरथ काशीद,रमेश माने,कृष्णा सोळंके,शिवाजी बोबडे माऊली जोरवर माऊली जोगदंड,देविदास भुजबळ यांच्या सह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
फोटो :- शेतकरी संघटनेच्या जिल्हा बैठकीस मार्गदर्शन करतांना कालीदास आपेट

COMMENTS