वर्ल्ड वाइल्ड प्लांटेशन वृक्षारोपन कार्यात उष्कृष्ठ कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील १२ निसर्ग व पर्यावरण प्रेमी यांना आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान : भुसावळचे महाराष्ट्र टिम लिडर नाना पाटील यांचे कार्य ठरले कौतुकास्पद ;

भुसावळ : वर्ल्ड वाइल्ड प्लांटेशन वृक्षारोपन कार्यात उष्कृष्ठ कार्य केल्याने महाराष्ट्रातील बारा निसर्ग व पर्यावरण प्रेमी यांना आंतरराष्ट्रीय...

भुसावळ : वर्ल्ड वाइल्ड प्लांटेशन वृक्षारोपन कार्यात उष्कृष्ठ कार्य केल्याने महाराष्ट्रातील बारा निसर्ग व पर्यावरण प्रेमी यांना आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले . यामध्ये राज्य समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच व वर्ल्ड वाईड प्लांटेशनचे भुसावळ येथील महाराष्ट्र टिमचे लिडर नाना पाटील सर यांचे कार्य विशेष कौतुकास्पद ठरल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येवून त्यांना आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला .ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डेप्युटी सेक्रेटरी म्रिंगका अचल, लोकसभा भारत सरकार, डीसीएम, इओआय बशीर अहमद राजदूत जकार्ता इंडोनेशिया, पद्मश्री प्राप्त कवी सत्येंद्र शर्मा, पद्मश्री प्राप्त के एस रावत, आय.ए.एफ एअर कंमाडर डॉ. अश्मीदर बहल, भारतीय आर्मीचे मेजर जनरल विक्रम देव डोग्रा, रेडीओ मेरी आवाज चे सीईओ अमित चौधरी, शैक्षिक आगाज च्या संस्थापिका स्मृर्ती चौधरी, लिटल हेल्प च्या संचालिका समृद्धि चौधरी, ओमान हून मिनल देवरा आदीं प्रमुख उपस्थित होते . ७रोजी झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत संरस्वती वंदना व दिप प्रज्वलनाने करण्यात आली . यावेळी प्रमुख पाहुण्याचा परिचय करण्यात आला . राजस्थान मधील चरीत दिक्षीत यांनी राजस्थानी लोकगीत सादर केले . यानंतर लिटील हेल्प या संस्थेच्या संस्थापिका

समृद्धी चौधरी हिने ही संस्था कशी स्थापन झाली अतिशय अप्रतिम भावना प्रधान शब्दात सांगितले .

यानंतर रेडीओ मेरी आवाज चें सिईओ अमित चौधरी यांनी रेडीओ मेरी आवाज मार्फत देश परदेशात कसे कार्य सुरु आहे आणि पर्यावरण क्षेत्रातही कार्य कसे करते याविषयी माहीती दिली . स्मृर्ती चौधरी यांनी शैक्षिक आगाज माध्यमातून शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण व विविध उपक्रम शिक्षकांन मार्फत निसर्ग पर्यावरण सारखे उपक्रमाची माहिती दिली . त्यानंतर छत्तीसगड च्या प्रसिद्ध लोकगीत गायिका प्रभा जोशी यांनी लोक गीत सादर केले. नंतर स्मृती चौधरी यांनी विविध राज्यातील व परदेशातील टिम लिडर्स यांची ओळख करून देतांना वर्ल्ड वाईड प्लांटेशन कार्यात एक लाख तेरा

हजार झाडे लावण्याच्या कार्यात नाना पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सर्वात जास्त महाराष्ट्राने एकतीस हजार झाडाचे वृक्षारोपण एकाच दिवसात करण्यात आल्याने महाराष्ट्र टिमचे विशेष कौतुक करण्यात आले यात वृक्षमित्र आबासाहेब मोरे नगर ,रानमळा पॅटर्नचे वनश्री प्राप्त पी टी शिंदे अण्णा, राज्य समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच व वर्ल्ड वाईड प्लांटेशन चे महाराष्ट्र टिम लिडर नाना पाटील सर भुसावळ , प्रियवंदा तांबोटकर रायगड, जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा पाटील जळगाव, स्वाती धोटकर चंद्रपूर, दीपा गिरी नांदेड, सुमन जीरोनेकर नांदेड, सुरेन्द्रसिंग पाटील भुसावळ, सत्येंद्र पांडे पुणे, सेलिना अहमद नागपूर, अलका भटकर जळगाव या सर्वाना पर्यावरण मित्र पुरस्कार मान्यवराच्या उपस्थित ऑनलाईन देण्यात आले . या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी भविष्यात येणारी संकटे दूर करावयाचे असल्यास वृक्ष लावून संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगीतले .प्रसंगी कार्यक्रमात विविध राज्याचे लोकगीत सादर करण्यात आली. पद्मश्री सत्येंद शर्मा यांनी सुंदर कविता सादर केली . तीन तास चाललेल्या कार्यकमाला देशातून व देशाबाहेरून शंभर पेक्षा जास्त पर्यावरण प्रेमी ऑनलाईन उपस्थित होते . यावेळी ओमानच्या मिनल देवरा यांनी आभार मानले .

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group