* सोनपेठ तहसीलदार आशिषकुमार बिरादार ५१ हजारांच्या लाच प्रकरणात ताब्यात* सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ येथील तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांना...
*सोनपेठ तहसीलदार आशिषकुमार बिरादार ५१ हजारांच्या लाच प्रकरणात ताब्यात*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ येथील तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांना एका तक्रारकर्त्याकडून ५१ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड येथील एका पथकाने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.एका वाळूचे टिप्पर चालवण्यासाठी मध्यस्थामार्फत लाच मागितल्याची माहिती आहे. दरम्यान,या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु आहे.
सेलू येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी मागितलेल्या दीड कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या जिल्ह्यातील आणखी एका अधिकार्याविरुध्द केलेल्या या धाडसी कारवाईने जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS