लातूर : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा पुण्याच्या प्रशासन, अंदाज व नियोजन विभागाचे शिक्षण सहसंचालक वैजनाथ खांडके यांना वैजनाथ खांडके सेवापूर्ती महासन्मान सोहळा समितीच्यावतीने सेवानिवृत्तीनिमित्त शनिवारी सायंकाळी भावपूर्ण सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सहसंचालक अरुण ठाकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक संजय यादगिरे, भगवानराव देशमुख, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महेश करजगावकर, पुण्याचे शिक्षण संचालक औदुंबर उकीरडे, औरंगाबादचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, लातूरचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग, उस्मानाबाद डायटचे प्राचार्य बळीराम चौरे, मुरुड डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे, पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयातील राजेश शिंदे, पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयातील उपसंचालिका डॉ. वंदना वाहुळ, शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे, सहाय्यक शिक्षण संचालक ज्ञानेश्वर मोरे, लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, शिक्षण उपनिरीक्षक वंदना फुटाणे, रजनी खांडके यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना खांडके म्हणाले की, माझे आई - वडील शेतमजूर असताना त्यांच्यासह माझे बहिण, मेव्हुणे व सुसंस्कारीत सहवासामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. मी शिक्षण घेत असताना मला माझ्या गरिबीची जाणिव होती. त्यामुळे मला माझे ध्येय गाठता आले. आजच्या विद्यार्थ्यांनी आपली परिस्थिती लक्षात घेवून शिक्षणाला महत्त्व देण्याची गरज आहे. आतापर्यंत विविध पदांवर काम करताना मी त्या पदासह शिक्षण संस्था, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचार्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांनीही जबाबदारीचे भान ठेवून काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली.
विविध ठिकाणी काम करताना ज्यांनी - ज्यांनी शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न केला, त्यात खांडके यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे नमूद करून अध्यक्षीय समारोपात ठाकरे यांनी खांडके यांच्या कार्याचा गौरव केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खांडके यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रारंभी सेवापूर्ती महासन्मान सोहळा समितीच्या वतीने खांडके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील, सचिव प्रा. मुकूंद बोकारे, कोषाध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्रा. गोविंद घार, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. मारुती सूर्यवंशी, एकनाथ पाटील, बाबूराव जाधव, प्रकाश देशमुख, विलास जाधव, दिलीप धर्माधिकारी, मोतीभाऊ केंद्रे, कालिदास माने, जब्बार सगरे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव संजय पंचगल्ले व अब्दुल गालीब शेख यांनी केले तर आभार प्रा. शिवराम सूर्यवंशी यांनी मानले.

COMMENTS