नायगांव/ प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.बाळासाहेब पाटील खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील जेष्ठ व श्रेष्ठ राजकीय नेते माजी खासदार तथा मंत्री मा.भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या जन्मदिनानिमित्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ईरन्ना पाटील विद्यालय कार्ला चे मुख्याध्यापक,श्री भोसले सर,राघवेंद्र स्वामी विद्यालय लालवंडी चे मुख्याध्यापक,श्री संजीव कदम सर,जाधव पाटील,केदारवडगाव, हनुमंत पांचाळ, यांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाचे नियम पाळून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले तर आभार पवार सर यांनी मानले.यावेळी चोंडे बी.बी शेख एस.जी,सांस्कृतीक विभाग प्रमुख पेटेकर बी.सी,कपळे बी.एन,पवळे सर.
,अन्सापुरे बी.एस,गायकवाड एस.एन,पांचाळ एम.एस,चोपवाड मामा,टेंभुर्णीकर मामा,शादुल मामा व सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

COMMENTS