नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुख्यमंत्री ना.श्री.उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शिक्षक सेना तालुका शाखा मुखेड च्या वतीने म.रा.शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष आंबुलगेकर यांच्या मार्गर्शनाखाली जि.प.प्रा.शाळा पळसवाडी,लोका तांडा,रत्ना तांडा,*
*आखरगा,आबादी नगर तांडा* या शाळेमध्ये *वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.व्यंकटरावजी माकणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.शिवशंकरराव जंपलवाड केंद्रप्रमुख शिवाजीराव जाधव, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष राम जाधव जिल्हा सहसचिव सचिन रामदिनवार,जिल्हा सल्लागार संजय कोटगिरे शिक्षक सेनेचे नवीन प्रवेश घेतलेले गोविंद गिरी* संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तालुका कार्याध्यक्ष पद्माकर जवळदापके,मुख्याध्यापक गोपाळ बर्गे,अरविंद जाधव,प्रमोद पाटील चिद्रावार,बाबुराव बोडके,शिवाजीराव राठोड, प्रशांत चौधरी,चंद्रकांत काळे, विनोद कांबळे,हरिदास कोटलवार,जाधव सर,वसंत चव्हाण,उत्तम चव्हाण* व इतर सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.
या उपक्रमासाठी
तालुका शाखेचे केंद्रप्रमुख रविकुमार कामन्ना,मारोती लंगोटे,किरणकुमार पडोळे,मनोहरराव जाधव, मोहनावती पतसंस्थेचे संचालक शरद डावकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS