प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी परिक्षत्रातील चारही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईची विषेश मोहिम राबविण्याचे आदेश दिले असुन जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या कडून कारवाई चा धडाका सुरू आहे. शनिवारी मिळालेल्या गुप्त माहिती वरून आयपिएस देशमुख यांच्या पथकाने आखाडा बाळापुर हद्दीत जुगार अड्यावर छापा टाकून मोठ्या जुगार अड्यावर कारवाई केली आहे. या कारवाई नंतर नांदेड परिक्षत्राचे कर्तव्यदक्ष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आखाडा बाळापुरचे ठाणेदार रवि हूंडेकर यांच्या वर नीलंबनाची कारवाई केली आहे. नांदेड परिक्षत्राचे डिआयजी तांबोळी यांनी परिक्षत्रातील चार ही जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेणार नाही असा ईशारा जिल्हा पोलिस प्रमुखांना दिला होता. ज्याविषयी हिंगोली चे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी गुन्हे आढावा बैठकित जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना अवैधधंदे वर कारवाई करण्याचे सुचना दिल्या होत्या. मात्र काही ठाणेदारांकडून याला दुजोरा देत ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत आहेत. ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख हे कारवाई करीत आहेत. काल बाळापुर ठाण्याचे हद्दीत मोठ्या जुगार अड्यावर कारवाई केल्यानंतर डिआयजी तांबोळी यांच्या आदेशाने आखाडा बाळापुचे ठाणेदार रवि हुंडेकर यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बाळापुर ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयाची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या बिट जमादार यांना नव्हती का? ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी ठाण्याच्या बिट जमादार सोबत स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष बिट जमादाराची नियुक्ती केली जाते. मग एलसिबी च्या बिट जमादाराला अवैध धंद्याची माहिती नव्हती का? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. तर डिआयजी तांबोळी यांच्या कारवाई ने जिल्ह्यातील ठाणेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

COMMENTS