मनसेची मागणी
सोनपेठ/प्रतिनिधी
तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी मनसेच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे केली आहे.निवेदनात असे नमुद केले आहे की,मागील आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे तालुक्यातील सर्व पिकांचे नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्ण संकटात सापडला आहे.प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून कापुस,सोयाबीन,तुर,मुग,उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी.असेही नमूद करण्यात आले आहे.तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून शासनाने लवकर मदत जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष नंदकिशोर रोडे,मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार,शहराध्यक्ष संदिप कांबळे,मनविसे तालुका उपाध्यक्ष गणेश रोडे,बापु कांबळे,महेश लोमटे,ज्ञानोबा रोडे,दिनेश शिंदे,राजु माने,किरण कोलते,दिपक भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS