राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यात मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदीसह सर्वच नाले दुथडी भरून वाहत आहेत.अद्याप पर्यंत कुठलीही अप्रिय घटना घडली नसली तरी खरिप पिके मात्र धोक्यात आली आहेत.
माहूर तालुक्यातील माहूर,वाई बाजार,सिंदखेड व वानोळा या चारही परीमंडळात मृग नक्षत्रात झालेल्या दोन ते तिन मोठया पावसानंतर पिके जगतील असा हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता.मात्र गेल्या चार दिवसांत दिवसरात्र सुरू असलेला पाऊस खरीप पिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे.अनेक भागात नाल्या काठची शेतजमीन खरडल्या गेली आहे.माहूर तालुक्यातील चारही परीमंडळात अनुक्रमे माहूर 70 मिमी,वानोळा 69 मिमी,सिंदखेड 69 मिमी व वाई बाजार 68 मिमी एवढी पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.
*मागील वर्षी आता पर्यंत झालेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे,तसेच अद्याप पर्यंत कुठलीही अप्रिय घटना घडली नसल्याची माहिती तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी दिली आहे.*

COMMENTS