राम दातीर माहूर (प्रतिनिधी )राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना सुखी,समाधानी व दीर्घायुष्य लाभू दे,त...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना सुखी,समाधानी व दीर्घायुष्य लाभू दे,त्यांची ईच्छा पूर्णत्वास ने अशी भाजपाचे कार्यकर्ते समर त्रिपाठी, नंदकुमार जोशी, विजय आमले, पद्मा गि-हे, अनिल कान्नव, जीवन अग्रवाल,अपिल बेलखोडे,प्रमोद सोनकर, रिठे गुरुजी यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी श्री रेणुकामातेला प्रार्थना केली.
दि.22 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा वाढ दिवस,त्याचे औचित्य साधून स्थानिक कार्यकर्त्यांनी महाद्वारा जवळ ' श्री ' च्या प्रतिमेला अभिषेक घालून महाआरती केली.या विधीचे पौरोहीत्य वेशासं संजय काण्णव व अनिल काण्णव यांनी केले.

COMMENTS