सोनपेठ/प्रतिनिधी
ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांमध्ये जनसेवेसोबतच आरोग्यासाठी दायित्व देण्याची भावना निर्माण झाली पाहीजे तेव्हाच निरोगीपणा समाजात नांदेल असे मत सोनपेठचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी व्यक्त केले.ते शिर्शी येथे उपसरपंच तथा सकल ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी बोलत होते.त्यांनी पुढे बोलताना सांगितले की,परोपकार करण्याची शिकवण ग्रामीण भागाने शहरी भागातील नागरिकांना दिली आज ही शिकवण अमलात आणण्यासाठी पुढाकार घेणे महत्वाचे असल्याचे सांगत अंकुश पवार यांच्यासारखे सेवाभावी वृत्तीचे लोक ग्रामीण भागात ठिकठिकाणी निर्माण व्हावेत यामुळे समाजात बंधुभाव नांदेल आणि रोगराई संपेल कोरोनासारखा भयंकर आजार दोन वर्षांपासून थैमान घालून बसलेला आहे.दोन लाटी येऊन तिसरी येण्याची भीत जागतिक आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सांगितली जात आहे.कोरोना काळात रक्ताचा तुटवडा हा सर्वात मोठा प्रश्न सर्वच वैद्यकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे रक्त उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना आपले जीव गमवावे लागल्याची प्रचंड उदाहरणे आहेत.मी संकल्प केला होता की,मी तालुक्यात तहसीलदार म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक महिन्याला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले पाहीजे या संकल्पाला अंकुश पवार यांनी ग्रामीण भागात सुरुवात करुन बळ दिले असल्याचेही बिरादार यांनी सांगितले.यावेळी सोनपेठचे युवा नेते तथा सुमित फाऊंडेशनचे सुमित पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार,सरपंच भागवत (अण्णा) सोळंके,माजी सरपंच ज्ञानेश्वर फले यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर मंडळअधिकारी एकलिंगे,मा.सरपंच सूनिता रणदिवे,लक्ष्मण मुंडे,दादाराव राठोड,सुनील जाधव इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS