नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. दिपक बच्चेवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, उपवित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, हुशारसिंग साबळे तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह सुधाकर शिंदे, शिवाजी चांदणे, हरीश पाटील, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, शिवाजी हंबर्डे, तुकाराम हंबर्डे व विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करीत लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS