नायगांव/ प्रतिनीधी (रामप्रसाद चन्नावार)
गेली तीन दिवसापासुन तालुक्यात चालु आसलेल्या संतधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तर खुटयाचे जनावरे सुटल्या नसल्याने जनांवरांची तांरबळ
उडाली आहे .तीन दिवसापासुन सुर्यदर्शनच नाही .अति पावसाने पिके धोक्यात आली आसुन शेतकरी संकटांत सापडला आहे . शासनानी त्वरित पिकांचे पंचनामे करून मदत करावी आशी मागणी मा.जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केली आहे.
गेली तीन दिवसापासुन नायगांव उमरी धर्माबाद तालुक्यात संतधार पाऊस चालु च आसल्याने आनेक शेतातील पिका मध्ये पाणी साचले आहे .परिसरातील आनेक नदी नाल्ये तुंडुब वाहत आहेत पाऊस सतत चालु आहल्याने जनजीवन विस्कळीत झाले आसुन .नागरिक मात्र पावसामुळे घरात बसनेच पंसत करत आहेत .पावसाची झड आसल्याने गोटयातील खुटयाची जनावरे तीन दिवस सोडली नसल्याने जनावरांची तांरबळ उडाली आहे .पाऊस आसाच चालु राहीला तर पिकांना फटका बसण्याची शक्यता नाकरता येत नाहे हे मात्र निश्चत .
गेली तीन दिवसापासुन नायगांव तालुक्यात सुर्यदर्शन झालेच नसल्याने थंडीचे वातावरण पसरले आहे .
या वर्षी खरिप मध्ये शेतक-यांनी कापसा पेक्षा सोयाबीन या पिकाची मोठी लागवड केली आहे . परिसरातील कुंटूर ,बरबडा , मांजरम , नरसी चारी ही सर्कल मध्ये गेली तीन दिवसापासुन पावसाने चांलीच बॅटीग केल्याने शेतातील पिका मध्ये पाणी साचले आहे .परिणामी शेतक-यांना अति पावसाचा फटका बसला आहे .तर नदी ,नाले , विहीरी तुंडुम भरून वाहत आहेत . शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे . गेली तीन दिवसापासुन नायगांव विधानसभा मतदारसंघातील उमरी ,धर्माबाद ,नायगांव तालुक्यातील पिकाचे पावसाने मोठे नुसकान झाले आहे .शासनाने त्वरित पंचनामे करूण शेतकऱ्यांना मदत करावी आशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केली .

COMMENTS