नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
नायगांव तालुक्यातील व ग्रामीण भागातील गेल्या तीन ते चार दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिके उभळून जात असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी येऊ लागले असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात असून या भागात लगातार तीन ते चार दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सदरील शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी या मागणीसाठी
गजानन पाटील होटाळकर, रितेश पाटील कल्याण, जगदीश पाटील शिंदे, जगनाथ पाटील जाधव, श्रीनिवास पाटील बंडे यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे.
ग्रामीण भागासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्याच्या शेतातील पिके पावसाने अगोदरच पिवळी पडली होती परंतु त्यात आणखी पावसाने भर टाकल्यामुळे शेतातील पिके पाण्यात डम साचून पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्याचे मोठे पावसाने नुकसान झाले असल्याने शासनाने सदरील शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशा पद्धतीचे निवेदन नायगांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून सदरील मागणीचे प्रमुख गजानन पाटील होटाळकर, रितेश पाटील कल्याण, जगदीश पाटील शिंदे, जगनाथ पाटील जाधव, श्रीनिवास पाटील बंडे यांनी थेट मुख्यमंत्र्याकडेच मागणी केल्यामुळे नुकसान भरापाई लवकर मिळण्याची शक्यता आहे.
नायगांव तालुक्यातील यंदा शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, मूग, उडीत, तूर, ज्वारी, तीळ, आदी पिके सदरच्या पावसाने वाया गेले असून यंदा जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे मूग व उडीत या पिकांना फुल उगवत नसून या पिकावर रोगाचा पादुर्भाव झाला असल्याने नायगांव तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येते अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन या पिकाचे नुकसान झालेले आहेत त्यासाठी तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी गजानन पाटील होटाळकर, रितेश पाटील कल्याण, जगदीश पाटील शिंदे, जगनाथ पाटील जाधव, श्रीनिवास पाटील बंडे यांनी थेट मुख्यमंत्र्याकडेच मागणी केल्यामुळे नुकसान भरापाई मिळण्यासाठी मागणी केली आहे.

COMMENTS