परभणी : सेलू (जि.परभणी) येथील श्रीमती ताराबाई सोनाजीपंत कुलकर्णी ( वय ९०, सहकारवाडी ) यांचे शनिवारी (२४ जुलै) रात्री सव्वा नऊ वाजता वृद्धापक...
परभणी : सेलू (जि.परभणी) येथील श्रीमती ताराबाई सोनाजीपंत कुलकर्णी ( वय ९०, सहकारवाडी ) यांचे शनिवारी (२४ जुलै) रात्री सव्वा नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीमती कुलकर्णी ह्या
स्वातंत्र्य सैनिक तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी सचिव, आदर्श शिक्षक (कै) सोनाजीपंत कुलकर्णी यांच्या पत्नी होत. १९६७ ते १९७२ या काळात नगरसेविका त्या होत्या. सेलू महिला मंडळासह शहरातील अन्य सामाजिक संस्थांच्या कार्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (२५ जुलै ) सकाळी दहाच्या सुमारास तहसील रोडवरील शांतिधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी व शशिकांत कुलकर्णी ही दोन मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

COMMENTS