--------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
भारत सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागातील नागरीकांच्या खात्यात थेट हस्तांतरीत व्हावे यासाठी भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक , बँक आपल्या दारी अशी सुविधा चालू करण्यात आली ,गावातील पोस्टमन , पेन्शन, निराधार योजने अंतर्गत मदत असेल ,रोजगार हमी योजने अंतर्गत वेतन असेल मोबाइल रिचार्ज ,इतर खात्यात पैसे पाठवणे अशा विविध योजना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून सेवा दिल्या जात आहेत. या कोरोना काळात हि बँक ग्रामीण भागात अगदी जीवनदायी ठरली आहे, ह्या कोरोना काळात मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) पोस्ट ऑफिस चे ब्रँच पोस्ट मास्तर सूर्यकांत गंदिगुडे यानी नांदेड जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सर्वात जास्त डिजिटल अथवा सेव्हीगं खाते काढून सर्वात जास्त दैनंदिन ट्रान्जेक्शन करून पेन्शन योजनेच्या लाभधारकांना ,निराधार महिलांना , रोजगार योजनेचे वेतन,गर्भवती महिलांना शासनाची आर्थिक मदत थेट त्याच्या दारी दिली आहे, तरी सूर्यकांत गंदिगुडे यांनी कोरोना काळात केलेली कामगिरी अत्यंत प्रशसनिय आहे ,त्यामुळे त्यांचा डाक विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे डाक अधीक्षक माधवराव साहेब यांनी विशेष सत्कार करून गौरव केला यावेळी सहायक डाक अधीक्षक मामीडवार साहेब, मुखेडचे पोस्टमास्तर लोसरे साहेब, पोस्टल असिस्टंट सी. एस.पाटील व मुखेड तालुक्यातील सर्व पोस्टमन डाक विभागाचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

COMMENTS