सोनपेठ/प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपासून उदभवलेल्या कोरोना या गंभीर आजारांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले असतांना कोरोना आजार पाठ सोडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.पहीली लाट गेली दुसरी लाट गेली आणि आता तिसरी लाट येऊ लागली आहे.दोन वर्षांपासून कोरोनाच्या भीतीने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.आता बदल होणे शक्य नसल्याने कोरोनासोबत जीवन जगण्याची आणि लढा लढण्याची सवय लावणे गरजेचे असल्याचे मत विटा(बु.)येथील सरपंच लताबाई आरबाड यांनी व्यक्त केले.त्या विटा(बु.)येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील लसीकरण केंद्रात लसीकरण कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी त्यांनी सांगितले की, पाथरी तालुक्यात सर्वाधिक लसीचे वितरण गावासाठी करण्यात आल्याने त्यांनी आरोग्य विभागाचे आभार मानत जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले.मागील तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात विटा(बु.)लसीची उपलब्धता होत असून या लसीचे काटेकोर पालन करुन लसीकरण करून घेण्यात येत आहे.यासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड, उपसरपंच महादेव हारकाळ,ग्रामसेवक संदीप भोसले यांच्यासह आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक कांदे,के.एन.राठोड,आरोग्यसेविका पारडे,सहशिक्षक योगेश जाधव,श्याम पांचाळ यांच्यासह आदी परिश्रम घेत आहेत.


COMMENTS