नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
शासनाच्या गायरान जमिनीवर विविध प्रकारचे अतिक्रमण वाढले असून त्यामुळे धनगर समाजातील मेंढपाळ बांधव यांच्या मेंढ्या चरण्यासाठी जमिनी अपु-या पडत असल्याने मेंढपाळ बांधव बैचेन होत असून त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याने हा अन्याय होऊ देणार नाही, असे मत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी मेंढपाळ आर्मी मोर्चात व्यक्त केले.
वन विभागातील वन जमिनी मेंढपाळांना मेंढ्या चारण्यास उपलब्ध करून देण्यासाठी मेंढपाळ आर्मी या संघटनेचा नायगांव तहसीलवर मोर्चा धडकला, मेंढपाळ बांधवाच्या न्यायहक्कासाठी सांगली जिल्ह्यातील अर्जुन थोरात यांनी मेंढपाळ आर्मी या संघटनेची निर्मिती केली असून या संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळ बांधवांनी नायगांव तहसीलवर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता, या सदर मोर्चामध्ये माजी आ. वसंतराव चव्हाण यासह जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, पं.स. सदस्य प्र.प्रा. मनोहर पवार, श्रीनिवास पा.चव्हाण, बालाजी मदेवाड, यांनी मेंढपाळ बांधवांच्या विविध समस्या विषयी आपले मत यावेळी व्यक्त करून तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी कुंटूर येथील सरपंच मारुती पा. कदम, बरबडाचे सरपंच माधव कोलगाने, ईकळीमाळ सरपंच शंकर गिरी महाराज,ताकबिड सरपंच शिवराज वरवटे, यांची उपस्थिती होती तर सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर शेट्टे, उत्तम देवदे, चंद्रकांत महादळे ,प्रभाकर कमळे, शेषराव गुंठे, हनुमंत कराडे, शामराव देवदे, दत्ता कराडे, पांडुरंग संबड, कोंडीबा शेटे, खंडू शेटे, देवराव गुंटे,हैबत गुंटे, पोचु शेटे, अशोक महादळे, मनु देवदे, खंडू कमळे, श्रावण कमळे आधीच जणांनी परिश्रम घेतले आहे.

COMMENTS