नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
दि 27 जुलै रोजी पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव येथे राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे. अब्दूल कलाम यांचा स्मृती दिनानिमित्य वर्ग दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला . डॉ . अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . एस .एस.सी. उत्तीर्ण गुणवंताचा गौरव करतांना . माजी आमदार गंगाधरराव पटने , आपल्या मनोगतातून मुलांना मार्गदर्शन केले , डॉ .कलाम यांच्या जीवनपट सांगितला . डॉ .कलाम अतिकष्टमय त्यांचे जिवन होते म्हणूनच देशाला मिसाईल मॅन त्यांच्या रुपाने सापडला .आयुष्यात कलाम वाचेल तो वाचेल, या उक्ती प्रमाने त्यांनी वाचनाला महत्व दिल्याचे ते सांगितले .म्हणाले, दहा, दहा तास , बारा बारा तास सारखे वाचन करत असत . अतिशय कष्टमय जिवन भोगल्या मुळेच देशाला आग्निक्षेपनास्त्रे मिळाले, हे विसरता येत नाही . त्यांनी सर्व गुणवंताना यशस्वी, पराक्रमी महान व्यक्तीचे चरित्र पुस्तके भेट दिले . कार्यक्रमास प्रमूख पाहूणे म्हणून लाभलेले रावसाहेब पाटील मोरे, तुकाराम पाटील मोरे, यांनी आपले मनोगत व्यक्त केली . गावातील प्रतिष्ठित नागरीक मा . नामदेव चिंचलवाड, मा .सरपंच, पांडूरंग मोरे, उपसरपंच,उपस्थित होते . गुणवंत विद्यार्थामध्ये 1 )हजूबेगम सरवर शेख प्रथम, क्रमांक 2 )खमर युसूफ शेख द्वितीय, 3 )नगमाबी शादूल शेख तृतीय, मातोश्री रामचंद्र रोडे, मयुरी माधव कुमनाळे, शिवानी टोकलवाड, आदी गुणवंत उपस्थित होते . सौ .गोदावरी विभुते मुख्याध्यापक, सहशिक्षक देवाले माधव, कोडांवार लक्ष्मण , धुळेकर उमाकांत, शिंदे आर .टी. रनविरकर दिलीप, शिवलिंगराव विभूते, गंगाधर बेळगे पिराजी शहापूरे, बालाजी नागठाणे आदी शिक्षक बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाची सांगता साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली .

COMMENTS