संमेलनाध्यक्ष मा. श्री.ए.के.शेख सर, सुप्रसिद्ध गझलकार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय ऑनलाईन तिसरे काव्य संमेलन उत्साहात रंगले

       अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेचा कोकण प्रदेश व पुणे विभाग, तेजस्विनी महिला संस्था, पुणे आणि जि.प. प्राथमिक शाळा कोरेगाव ...



       अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेचा कोकण प्रदेश व पुणे विभाग, तेजस्विनी महिला संस्था, पुणे आणि जि.प. प्राथमिक शाळा कोरेगाव भिवर, ता.दौंड,जि.पुणे, यांच्यातर्फे शुक्रवार दि.२३ जुलै २०२१ रोजी राज्यस्तरीय तिसरे ऑनलाईन भव्य काव्य संमेलन *“गुरुवंदना”* आयोजित करण्यात आले होते.आदरणीय स्वर्गीय राजकुमार काळभोर सर यांच्या स्मृतिस अभिवादन करून काव्यसंमेलनाची सुरुवात *कु.रेखा कर्पे* यांनी 'गुरूने दिला ज्ञानरूपी वसा' या ईशस्तवन गायनाने केली. प्रस्तावना सौ. जयश्रीताई नांदे यांनी केली व स्वागत श्रीमती शुभांगीताई काळभोर यांनी केले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून गुरूंबद्दल आपले भाव लेखणीतून व्यक्त करण्यासाठी अनेक सारस्वतांनी स्वलिखित मराठी कविता स्वतःच्या आवाजात गाऊन सादर केल्या.


काव्यसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे *अमेरिकेतून* सौ.अपर्णा नानिवडेकर, कु.अनन्या व वरद नानिवडेकर यांनी सहभाग घेत आपल्या काव्यरचना सादर केल्या. *हैदराबाद* येथून सौ. राजश्री वाणी-मराठे यांनीही काव्य संमेलनात भाग घेतला. *नाशिक येथून राजनंदिनी,सिद्धराज व सौ.दिपश्री मेने यांनी व पुणे येथून *शाहीर देवराव कांबळे यांनीही पारंपारिक वेशभूषा करून काव्य सादर केले. जैतापूर येथून सौ.स्वरांजली करगुटकर, तसेच रत्नागिरी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, जळगाव, पनवेल, राजापूर, , मुंबई, पुणे अशा अनेक जिल्ह्यांमधून अनेक चिमुकले बाल कवी / कवयित्री सहभागी झाले.


या भव्य दिव्य काव्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून *मा. श्री.ए.के.शेख सर,* सुप्रसिद्ध कवी,ज्येष्ठ साहित्यिक,गझलकार लाभले होते. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेतील मधुर गझलरचना सादर करून सर्वांचे मन जिंकले. मनाला पटेल ते करायचे आणि आनंदी रहायचे असा संदेश त्यांनी दिला..डॉ.अलका नाईक यांनी अंतरात्म्यात गुरु शोधावा, कष्ट करा, कृतज्ञ रहा, करूणा करा असा संदेश दिला. आणि आई ही प्रथम गुरु म्हणून “माझी माय” ही कविता अत्यंत हळव्या सुरात गाऊन सादर केली.


विशेष अतिथी म्हणून डॉ.सौ. शोभा खंदारे मॅडम,प्राचार्या- डायट पुणे,श्री.नवनाथ वणवे साहेब, गटशिक्षणाधिकारी दौंड,पुणे हे होते. त्यांनी आपल्या व्यस्त कामाच्या व्यापातून अनमोल शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.


संमेलनाचे उद्घाटन डॉ.अ.ना.रसनकुटे अ.भा.म.सा.प.कोकण प्रदेशाध्यक्ष यांनी केले व आपल्या शुभेच्छा दिल्या.काव्यसंमेलनास श्री.शरद गोरे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचे आशिर्वाद व पुढील मार्गदर्शक मान्यवर लाभले होते. श्रीमती शुभांगीताई काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्षा, अध्यक्ष- तेजस्विनी संस्था, पुणे.

 डॉ.अ.ना.रसनकुटे, कोकण प्रदेशाध्यक्ष.                   

डॉ.अलका नाईक, कोकणप्रदेश उपाध्यक्षा, सल्लागार- तेजस्विनी संस्था, पुणे.

सौ. जयश्री नांदे,पुणे विभागीय सचिव, सदस्या- तेजस्विनी संस्था पुणे.

सौ. संगिताताई लंघे, सदस्या- तेजस्विनी संस्था पुणे.- मुख्या.जि.प.प्राथ.शाळा कोरेगाव भिवर,ता.दौंड,पुणे.

प्रसिद्धी समितीमध्ये

  तेजस्विनी. पत्रकार प्रा. अमिता कदम, सौ.मनीषा कडव 

आणि प्रा. श्री.राजेंद्र शेळके, यांनीही चांगले सहकार्य केले.

   काव्यसंमेलनास केंद्रप्रमुख मा.श्री.संपत सटालेसाहेब तसेच श्री.दादासाहेब शेलार,श्री.संदिप कदम,श्री.सोमनाथ लंघे,श्रीम.सुजाता गायके,श्रीम.प्रतिमा भुजंगे,सौ.ज्योती लाळगे या शिक्षकांनीही आपल्या गुरूंना काव्यसुमनांजली वाहिली. सूत्रसंचलन व सर्वांचे आभार सौ. संगिताताई लंघे यांनी मानले.

   आदरणीय गुरू डॉ.अलकाताई नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाची परिणीती उत्कृष्ट नियोजन व आयोजनाने राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय संमेलनात झाली. शेवटी गुरुर्ब्रम्हा गुरुरविष्णू अशी प्रार्थना म्हणून सांगता झाली

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group