अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा – आ. बालाजी कल्याणकर

आ. बालाजी कल्याणकर, तहसीलदार किरण आंबेकर व मंडळ अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी  -----------------------------------------------------------...


आ. बालाजी कल्याणकर, तहसीलदार किरण आंबेकर व मंडळ अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी 

----------------------------------------------------------------

नांदेड- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड उत्तर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी तहसीलदार किरण आंबेकर, मंडळ अधिकारी अनिल धुळगुंडे, तलाठी मंगेश वांगीकर व कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन राहाटी, सोमेश्वर नाळेश्वर, ढोकी, जैतापूर परिसरातील पिकांची पाहणी केली आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी तात्काळ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याबाबत महसुल प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

                               नांदेड उत्तर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आसनानदी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबरोबरच सोमेश्वर, राहटी, जैतापूर, ढोकी, सुगाव, बोरगाव, आलेगाव, निळा, चिखली, एकदरा, नांदुसा, कासारखेडा, लिंबगाव यांच्यासह आदी गावातील गावातील शेतकऱ्यांची पिके पावसामुळे आडवी पडली आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापूस, सोयाबीन, तुर, हळद यासारखी नगदी पिके पिवळी पडू लागली आहेत. तसेच केळी, ऊस ही पिके वाऱ्यामुळे आडवी पडली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी शनिवारी सकाळी तहसीलदार किरण आंबेकर यांना घेऊन राहाटी, नाळेश्वर, सोमेश्वर परिसरातील पिकांची पाहणी केली आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी तहसीलदार किरण आंबेकर यांना तात्काळ पिकांचे पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या आहेत. यावर तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामे सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत तहसीलदार किरण आंबेकर, मंडळ अधिकारी अनिल धुळगुंडे, तलाठी मंगेश वांगीकर, कृषी सहाय्यक बि. जे. होनवडजकर हे उपस्थित होते. तसेच संतोष भारसावडे, संतोष पावडे, बाबुराव वाघ, सरपंच रुपेश वाघ, राहुल वाघ, अतुल वाघ, बालाजीराव वाघ, मोहन पतकी, गणपत गोभाडे, नवनाथ काकडे, गजानन वाघ, राहाटी येथील बालाजी बोकारे, विनायक बोकारे, गब्बू बोकारे, गणेश बोकारे, व्यंकटी बोकारे, राजेश बोकारे, गणेश बोकारे सोमेश्वरकर, विनायक बोकारे तसेच ढोकी येथील बळीराम डाकोरे, केशव चपाट, गंगाधर लबडे, राम चपाट, बबन लबडे, बाबाराव लबडे, व्यंकटराव चपाट, राजू घोगरे यांच्यासह नाळेश्वर, राहाटी, सोमेश्वर, ढोकी या परिसरातील आदी शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group