परभणी जिल्ह्यातील सेलु ठाण्यात दि. 03 मे रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अपघातातील मयताच्या पत्निची आँडीओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी सेलुचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी यातील तक्रारदारास "मी तुझी आँडीओ क्लिप ऐकली आहे".
तुला या प्रकरणातुन बाहेर पडायचे असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील असी मागणी केली. पण तडजोडीत दिड कोटी देण्याचे ठरले.
तक्रारदारास ही लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने याची तक्रार मुंबई च्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात केली. या नंतर ACB ने सापळा लावून पडताळणी केली. पडताळणीत लाच मागीतल्याचे सिद्ध झाले. दिड कोटी रुपया पैकी पहील्या हप्त्यापोटी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या साठी दहा लाख रुपये पोलीस शिपाई गणेश चव्हाण यांच्या मार्फत स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस शिपाई गणेश चव्हाण यांच्या विरुद्ध सेलु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस दलातील असे बडे अधिकारीच जर एवढ्या मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी करत असतील तर सामान्य मानसाला काय न्याय मिळणार ? असे लाचखोर पोलीस अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलाला काळीमा फासण्याचे काम करत असल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. दिवसेंदिवस पोलिस दलात लाचखोरी वाढतच चालल्याचे दिसुन येत आहे. पोलिस उपाधिक्षक यांनी तब्बल दोन कोटी रूपायांची लाच मागितली...
.

COMMENTS