सोनपेठ/प्रतिनिधी
गोरसेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा,सकल ओ.बी सी.समाजाचे जिल्हाध्यक्ष व सोनपेठ तालुक्यातील शिर्शीचे उपसरपंच अंकुश भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन२७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सदर शिबीर होणार आहे. करण्यात आले असल्याची माहिती गोरसेनेच्या वतीने नुकतीच देण्यात आली.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नेहमी रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचेही गोरसेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.मागील अनेक वर्षांपासून अंकुश पवार हे सामान्य लोकांच्या मदतीला धावून राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यावर जिल्हा गाजवलेला असून मागील काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला त्यांचा निसटता पराभव झालेला होता.तसेच त्यांनी त्यांच्या नवजीवन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे करुन समाजात आपले भरीव योगदान दिलेले आहे.या कार्यातून उतराई न होता आजारी माणसाच्या कामी येण्याचा संकल्प अंकुश पवार यांच्या माध्यमातून करण्यात आला होता.त्या पार्श्वभूमीवरच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरास तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार,गटविकास अधिकारी सचिन खुडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार,वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू राठोड,ग्रामसेवक राजाराम सोळंके,पत्रकार सिद्धेश्वर गिरी परिचारिका लटपटे,परिचारक कणसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबीरात भाग घेण्याचे आवाहन सरपंच भागवत सोळंके,सुभाबाई राठोड,धुराजी साळवे,भगवान कांदे,मारोती सोळंके गोरसेनेचे तालुका संयोजक भगवान राठोड,गुलाब शेख,गोरसेनेचे सोनपेठ तालुकाध्यक्ष लहू राठोड,राहुल जाधव,अजय राठोड,कार्तिक पवार,अर्जुन जाधव,विनायक चव्हाण,बाळा राठोड,अनिकेत राठोड,राहुल जाधव,पाथरी तालुकाध्यक्ष प्रल्हाद राठोड,सुनील चव्हाण,नामदेव चव्हाण,बंडू पवार,पंडीत चव्हाण,जिंतूरचे तालुकाध्यक्ष सुनील राठोड,सुनील आडे,परभणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव,नगरसेवक प्रल्हाद चव्हाण,जिल्हा संयोजक विलास राठोड पालम तालुकाध्यक्ष सोनू राठोड,गंगाखेड तालुकाध्यक्ष वैजनाथ आडे,धोंडीराम आडे,गोरसेना जिल्हा सचिव राजेश राठोड,पूर्णा तालुकाध्यक्ष बाबा राठोड,यांच्यासह आदींनी केले आहे.

COMMENTS