*मस्साजोग प्रतिनिधी- अनंत जाधव*
*शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कार्यशील मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी महाआरती व केज तालुक्यात शिवसेनेच्या पाच ठिकाणी शिवसेना शाखेचे विविध मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ*
या बाबतची अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित आज दिनांक 27.07.2021 रोजी शिवसेना संपर्क नेते मा.चंद्रकांत खैरे साहेब बीड जिल्हासंपर्क प्रमुख आनंदजी जाधव साहेब सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते व उपजिल्हा प्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी जिल्हा समन्वय संजय महाद्वार केज तालुका शिवसेना प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये केज तालुक्यात पाच ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले यात मौजे ढाकेफळ केज शहरात अयोध्या नगर क्रांती नगर धारूर रोड येथे शिवसेनेच्या शाखेचे व कानडी चौक येथे शिवसेना शाखेची स्थापना व ऑटो युनियन सेनेची स्थापना जल्लोषात करण्यात आली.
तत्पूर्वी मौज कुंबेफळ येथे गणपती मंदिरात महाआरती करून मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली
या वेळी कार्यक्रमाला उपस्थित शहर प्रमूख अनिल बडे तालुका समन्वयक बालु पवार युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात माजलगाव उप तालुका प्रमुख अतुल उगले दासू बादाडे पाटील तालुका संघटक अशोक जाधव सचिव रामहरी कोल्हे युवासेना शहर प्रमुख तात्या रोडे शिवसेना उपतालुका प्रमुख अभि घाटूळ विध्यर्थी सेना उपजिल्हा प्रमुख आनिल ठोंबरे सागर जाधव पप्पू ढगे शंकर गोक, आकाश बहिर अमोल घुले ऋषी घुले रवी फुके भारत तुपारे ,पिंटू अंधारे,परशु काळे,प्रभाकर शिंदे,चंदू चटप,शिवाजी थोरात,मंगेश पवार,किरण बडे, अशोक धूमक,शरद कांबळे, चंदू इंगळे, राहुल फुके, सह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS