नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
नायगांव तालुक्यात व परिसरात सलग चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील बऱ्याचश्या नदी ओढ्यांना पुर येऊन ते पाणी शेतात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुरामुंळे बरेच शेती खचली असुन शेतकरी राजा प्रचंड नुकसानात आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनास अहवाल पाठवावा व अतिवृष्ठी जाहीर करावे असे निवेदन युवक कॉंग्रेस नायगांव चे पदाधिकारी नगराध्यक्ष शरद भालेराव, नगरसेवक पांडू पाटील चव्हाण, सतीश लोकमंवर, संजय पाटील चव्हाण,सय्यद फय्याज,यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस कार्यकर्ते विठ्ठल लक्ष्मण बेळगे.
माणिक पा चव्हाण, साईनाथ चन्नावार, बंटी पाटील शिंदे, सुरज बेळगे, जयवंत बेळगे, शिवाजी चव्हाण, नवनाथ जाधव, सुनील सोनकांबळे, विजय अनिराये, बालाजी धोते, सुनील शेळगावे, साईनाथ कावडे, ज्ञानेश्वर वंगावार,इत्यादींनी तहसीलदार यांना निवेदन दिले..

COMMENTS