नांदेड परिक्षत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी परिक्षत्रातील चारही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईची विषेश मोहिम राबविण्याचे आदेश दिले असुन जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या कडून कारवाई चा धडाका सुरू आहे. शनिवारी मिळालेल्या गुप्त माहिती वरून आयपिएस देशमुख यांच्या पथकाने आखाडा बाळापुर हद्दीत जुगार अड्यावर छापा टाकून मोठ्या जुगार अड्यावर कारवाई केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ठाणेदारांचे धाबे दणाणले आहेत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे हद्दीत शेवाळा ते नरवाडी मार्गावर एका टिनपत्राच्या शेडमध्ये मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती आयपीएस यतीश देशमुख यांना मिळताच देशमुख यांनी आपल्या पथकास सोबत घेऊन जुगार अड्यावर छापा टाकला ज्यामध्ये नांदेड, उमरखेड, हदगाव, बाळापुर आदी ठिकाणच्या सात जुगार्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडुन नगदी रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, कार, मोटरसायकल असा ऐकून पावने पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी अवैध धंद्यावर कारवाई चा धडाका सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने शहर ग्रामीण च्या हद्दीत मोठ्या जुगार अड्यावर कारवाई केली आहे. बाहेर जिल्ह्यातील जुगारी हिंगोली जिल्ह्यात जुगार खेळण्यासाठी येत असुन सुद्धा ऐवढ्या मोठ्या जुगार अड्याची माहिती आखाडा बाळापुर पोलिस व त्या परिसरातील बिट जमादाराला नव्हती का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे..
*अवैध धंद्याची गुप्त माहिती द्या कारवाई केली जाईल- कलासागर*
हिंगोली जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्याची गुप्त माहीती देण्यात यावी पोलिसांन कडून कारवाई केली जाईल. तसेच माहिती देणाऱ्या चे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

COMMENTS