सेलू : ( ) दि. 24 जुलै रोजी सेलू तालुका टेबल टेनिस असोसिएशनला महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे महासचिव डॉ. प्रकाश तुळपुळे, राज्य कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे, यांची स्नेह भेट.
या प्रसंगी महासचिव टे.टे.असो. प्रकाश तुळपुळे म्हणाले की, टेबल टेनिस खेळाचा खरा प्रचार व प्रसार हा तालुकास्तरा पासून झाल्यास निश्चित राज्य संघटना बळकट होईल, यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये टेबल टेनिस खेळ चा प्रसार होणे गरजेचे आहे, जिल्हा संघटनानी तालुका संघटनाची स्थापन करून खेळाचा प्रसार करावा. सेलू तालुका टे.टे.असोसिएशनचे उत्तम उदाहरण आहे.
सेलू तालुका टे टे.प्रशिक्षण केंद्रातील उदयोन्मुख खेळाडू अशितोष जाधव व सुधांसु जाधव यांचा खेळापाहुन त्यांचे कौतुक करून सत्कार करण्यात आला.
सेलू तालुका टे.टे. असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य टे.टे. असोसिएशनचे महासचिव प्रकाश तुळपुळे, राज्य कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे, पुणे जिल्हा सचिव श्रीराम कोणकर, गरुड भैय्या (धुळे), सुभाष देसाई (कोल्हापूर), कुलजिंतसिंग दरोगा (औरंगाबाद),
या मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ.संगिता खराबे, मुख्याध्यापक रामकिशन मखमले, तालुका अध्यक्ष डॉ. ऋतुराज सांडेगांवकर, उपाध्यक्ष प्रताप घांडगे, कोषाध्यक्ष रोहित काला, तालुका सचिव किशोर भांडवले, पराग गोळेगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम चे सुत्र संचलन जिल्हा सचिव गणेश माळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड शिवाजी जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टे.टे.प्रशिक्षक निखिल झुटे, गजानन राऊत, परीश्रम घेतले.


COMMENTS