नांदेड जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या विचार श्रेणीतुन शेतकऱ्याच्या हितासाठी नायगांव भूमी पुत्राचे राष्ट्रीयकृत बँकांना विविध मागण्याचे निवेदन

नायगांव/प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा नांदेड जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव...


नायगांव/प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

नायगांव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा नांदेड जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या विचार श्रेणीतुन तालुक्यातील तमाम शेतकऱ्याच्या हितासाठी व हित जोपसण्यासाठी नायगांव नगरी येथील युवकाचे नेतृत्व करणारे भूमीपुत्र युवक काँग्रेसचे माणिक चव्हाण यांनी राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले असून आता पर्यंत बँकेच्या व्यस्थापना कडून शेतकऱ्यांना अनेक कामासाठी व अनेक योजनेचा लाभ मिळविण्या करिता शेतकऱ्याला बँकेकडे हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे सदरचे निवेदन देण्यात आले आहे.

नायगांव शहरातील राष्ट्रीयकृत बँका म्हणजे भारतीय स्टेट बँक,असो की हैद्राबाद बँकेचे इंडिया बँकेत विलगीकरण झाले असले तरी या बँकेचा विषय लावून धरला गेला असून महाराष्ट्र ग्रामीण बँक असो की बी ओ आय असो या सदरील बँकाकडे अनेक वेळा तालुक्यातील शेतकऱ्यानी कर्जासाठी व विविध कामासाठी फेऱ्या मारल्या तरी बँक प्रशासनाने जन सामान्य शेतकऱ्याची दखलच घेतली नसल्यामुळे सदरच्या बँक शाखाधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी नायगांव येथील युवक काँग्रेसच्या युवकांनी विविध मागण्याचे निवेदन देऊन त्यांचे पितळ उघडे निवेदन दिले आहे .

बँक शाखाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील मागण्या व बँके कडून तात्काळ माहिती पट मिळण्यासाठी राज्यशासनाने चालू बाकीदाराला ५० हजार सन्मान पूर्वक देण्याचे जाहीर केले होते आज पर्यंत किती शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले, चालू वर्षामध्ये पीककर्ज वाटपाचे टार्गेट होते ते की वाटप झाले, सन २०१९ वर्षातील पीकविमा जमा झाला का ? झाला असल्यास बँक कधी वाटप करणार, शेतकऱ्याच्या पॉईपलाईनसाठी किती कर्ज वाटप करण्यात आले व किती उदिष्ट होते यांचा ही अंदाज लागत नसल्यामुळे सदरचे निवेदनांतून माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यासाठी शैक्षणिक कर्ज किती वाटप केले व त्यांचे किती पर्यंत टार्गेट होते, चालू बाकीदारांना तीन लाख पर्यंत बिनव्याजी लोन करण्यासाठी शासनाने धोरण आखले होते त्यांची आमलबजावणी कार्यन्वित करण्यात आली का, आणासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत तालुक्यातील किती लाभ घेऊ लाभार्थाना कर्ज वाटप केले आणि किती लाभार्थी बाकी आहेत,महाराष्ट्र राज्यातले आघाडी सरकाने केलेले कर्ज माफीचे काम पूर्ण झाले का यांचा शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचा अंदाज लागत नसून कर्ज माफी झाली असल्यास शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले असले तरी इतर शेतकरी शिल्लक आहेत, उर्वरीत शेतकऱ्यांना कर्ज आता वाटप करणार आहात का नाही या संदर्भात बँकेच्या शाखाधिकाऱ्याचे बँकेचे धोरण काय आहेत

नायगांव तालुक्यातील ८८ ते ८९ गावातील शेतकरी कोणत्याही कारणास्तव अडचणीत येऊ नये म्हणून नांदेड जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या दुरष्ठीच्या माध्यमातून व युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण यांच्या सहकार्याने माणिक चव्हाण यांनी बँकेच्या शाखाधिकाऱ्याला निवेदन देऊन मुद्रा लोनचे आता पर्यंत किती वाटप केले व उदिष्ट किती होते हे माहिती मिळणे गरजेचे असल्याचा चाव्हणं यांचा हेतू असून संजय गांधी,निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे पैसे कोणत्या महिन्यात वाटप करण्यात आले आपापल्या बँके मार्फत इतर कोणत्या योजनेसाठी कर्ज वाटप केले जाते त्यांची माहिती मिळणे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याना दिनांक २६ जुलै २०२१ रोजी दुपारी एक वाजता निवेदन देण्यात आले या वेळी .

युवक काँग्रेसचे माणिक पाटील चव्हाण सुमित पाटील कल्याण प्रकाश पाटील वडजे नवनाथ पाटील जाधव श्रीहरी पाटील सोमठाणकर जयराज पाटील पांढरी सुनील पाटील शेळगाव गजानन पाटील तमलूरे अभिजीत मंगरुळे साईनाथ नामवाडे अमोल मोरे महेश पवार नरेश लांबदांडे सुनील जाधव यांनी बँकेच्या शाखाधिकाऱ्याना निवेदन दिले असून या पुढे नायगांव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान जिल्हाअध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व बांधव काम करणार आहोत असे ठणकावून सांगितले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group