सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून शिवसंपर्क अभियान राबवून ग्रामीण भागात शिवसैनिक घडवण्याचे काम तालुका शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.शिवसेनेच्या वतीने शेतकरी,मजूर,कामगार,कर्मचारी,युवक,युवती,यांचे प्रश्न समजावून घेत त्यांचे प्रश्न जागेवर सोडवण्याचा प्रयत्न खा.संजय(बंडू)जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा दिवसापासून चालू आहे.ग्रामीण भागात शिवसेनेला वाढते पाठबळ मिळत असल्याने काही ठिकाणी नव्याने शाखा स्थापन करण्याची गरज लक्षात घेऊन मंगळवार २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे खा.संजय(बंडू)जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात पाच ठिकाणी शिवसेना शाखा नूतनीकरण करुन वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार असल्याचा मनोदय शिवसेना तालुकाप्रमुख भगवान पायघन यांनी व्यक्त केला.ते शिवसंपर्क अभियानात नरवाडी येथे बोलत होते.त्यांनी पुढे बोलतांना सांगितले की,उपस्थित शिवसैनिकांना ऊर्जाचे स्फूरणयुक्त मार्गदर्शन केले.यावेळी भविष्यात सोनपेठ तालुक्यातील शिवसेनेला निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करून प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी त्यांचा भाऊ,त्यांच्या परिवारातील सदस्य म्हणून उभा राहणार असल्याचे पायघन यांनी सांगितले.खा.संजय(बंडु)जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्याचा संकल्प यापूर्वीच केला असून प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या दुःखात आणि सुखात सोबत राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.याअभियानात सहसंपर्कप्रमुख पंढरीनाथ धोंडगे,उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे,तालुका समनव्यक रंगनाथ रोडे,तालुकाप्रमुख भगवान पायघन,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,रावसाहेब पांडुळे,उपशहरप्रमुख रामेश्वर सोलापूरकर,युवासेना उपतालुकप्रमुख संतोष गवळी,अविनाश जाधव,शहरप्रमुख अमोल दहिवाळ,उपतालुकप्रमुख माणिक खरात,संतोष धोंडगे, कारभारी लोकरे,रुस्तुम कलिंदर,कुमार चव्हाण,सर्कल प्रमुख दिगंबर चौधरी,आनंद गुजराथी,युवासेना उपतालुकप्रमुख बाबू शेख,उपशहरप्रमुख गणेश जोशी,श्रीराम मुंडे,भास्कर भोसले,शाखा प्रमुख विशाल भोरे,खाजा कुरेशी,दीपक बचाटे यांच्यासह शिवसेना,युवासेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

COMMENTS