नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
तालुक्यातील नायगांव शहरातील रहिवाशी असलेले साईनाथ किशनराव नामवाडे यांची नायगांव येथे दिनांक २४ जुलै २०२१ रोजी ओंकार लॉज येथे आझाद समाज पार्टीच्या नायगांव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साईनाथ नामवाडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राहुल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्हाध्यक्ष राहुल दादा जिगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नांदेड येथे एक महत्त्वपूर्ण बैठकीत नियुक्ती करून पत्र देण्यात आले. त्याअनुषंगाने दि.२४ जुलै रोजी नायगांव येथील ओंकार लॉज येथे आझाद समाज पार्टीचे नूतन नायगांव तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे यांचा तालुक्यातील मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रदीप आनंदा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पुठ्ठेवाड, सतीश भद्रे, महेश पवार,विशाल कागदेवाद ,धनंज येथील उपसरपंच प्रतिनिधी व्यंकटराव पा.सूर्यवंशी ,पत्रकार माधव धडेकर आदींनी स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS