प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत शहर चे उपविभागीय पोलिस अधिकारी यतीश देशमुख यांनी कारवाई केल्यानंतर ग्रामीण चे उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी शनिवारी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध मटक्यावर कारवाई केली आहे. शहर व ग्रामीण डीवायएसपी च्या कारवाई ने हिंगोली ग्रामीण पोलिसांचे चांगलेच वाभाडे निघाले आहेत. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत 54 गावांचा समावेश असुन अनेक गावामध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी नांदेड परिक्षत्राचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ग्रामीण हद्दीत अवैध रेतीवर मोठी कारवाई केली होती. मात्र पुन्हा ग्रामीण ठाण्याचे हद्दीत जैसे थे परिस्थिती झाल्याने आता दस्तुर खुद्द पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी कारवाई चा धडाका सुरू केला आहे. शनिवारी ग्रामीण चे पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून लिंबाळा मक्ता येथे सुरु असलेल्या मटक्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय च्या पथकाने छापा टाकला यामध्ये चार आरोपीवीरोधात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांच्या कडून 7 हजार 830 रूपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस आधिक्षक राकेश कलासागर, उपाधिक्षक वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ढोले, राहूल गोटरे, शेखर यादव असेगावकर, पोले यांच्या पथकाने केली आहे.
*आयपिएस देशमुख यांची जुगार अड्यावर कारवाई*
हिंगोली शहरातील बावनखोली परिसरात एका टिनपत्राच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळाल्यानंतर यतीश देशमुख यांच्या पथकाने शनिवारी दुपारी बावनखोली परिसरात छापा टाकला यामध्ये सोळा आरोपी विरूद्ध मुंबई जुगार कायदे अंतर्गत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कडून 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

COMMENTS