केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव येथे सख्या भावाने मित्राच्या मदतीने बहिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या बाबतची आधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील बोरगाव येथे दि. २१ एप्रिल २०२१ बुधवार रोजी शितल लक्ष्मण चौधरी (वय २८ वर्ष) हिचा तिचा सख्खा भाऊ दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी संगनमत करून तीचा पलंगावर झोपलेली असलेल्या अवस्थेत गावा जवळील पांढरीचे शेतातील तिच्या चुलते माजी सरपंच जालिंदर गव्हाणे यांच्या शेतातील घरात तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत महिलेचा चुलतभाऊ नानासाहेब गव्हाणे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे आणि दिगंबर धनंजय वळेकर याच्या विरुद्ध गु र न १९७/२०२१ भा दं वि ३०२ आणि ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच
उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी भेट दिली आहे .
COMMENTS