केज/रमेश इतापे.
केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव येथील गणेश भागवत माळी हा मुलगा सोमवारी संध्याकाळी सहाच्या वाचण्याच्या दरम्यान सायकल वरून गायब झाल्याची बातमी परिसरामध्ये पसरू लागली मुलाचे वडील व गावातील ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास वाघ व मंडळी मुलाचा शोध घेऊ लागली परंतु मंगळवार सकाळपर्यंत कुठलाच पत्ता लागत नव्हता मुलाचे वडील भागवत माळी व श्रीनिवास वाघ यांनी नांदुर घाट पोलीस चौकी येथे धाव घेतली त्यानंतर जमादार मुकुंद ढाकणे .पोलीस नाईक शिवाजी सानप हे चौकीला होते. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी जमादार साहेबांना पूर्ण झालेली हकीगत सांगितली त्यानंतर जमादार मुकुंद ढाकणे यांनी पत्रकार श्रीकांतराजे जाधव यांना फोन केला कायदेशीर देखील काम चालू करू परंतु मीडिया मार्फत थोडी मदत घेऊ असे जमादार ढाकणे साहेबांनी सांगितले त्यानंतर पत्रकार श्रीकांत राजे जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश भागवत माळी याचा फोटो सर्व सोशल मीडियावर पसरवला त्यानंतर मंगळवार संध्याकाळपर्यंत सोशल मीडिया वरील फेसबुक पोस्ट पाहून वांनगावचे पत्रकार दादासाहेब जोगदंड यांचा फोन पत्रकार श्रीकांत जाधव यांना आला की हा मुलगा रात्री त्यांच्या हॉटेल वरती झोपायला होता त्यांनी त्याला चौकशी केली असता तो आज्जीकडे बीड ला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले त्यानंतर शोध घेण्यासाठी दादासाहेबांची मदत झाली थोड्याच वेळाने बीड येथून गेस एजन्सीच्या गाडीवर असलेला ड्रायव्हर यांनी व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून त्या मुलाचा फोटो पाहिला होता त्यानंतर त्याने तात्काळ फोन केले मुलाचा शोध लागला लगेच जमादार मुकुंद ढाकणे व भागवत माळी यांनी बीड येथे जाऊन मुलाला घेऊन आले व कुटुंबाला सुपूर्द केले त्यामुळे त्या कुटुंबातील भागवत माळी व त्यांच्या कुटुंबाला एक दिलासा मिळाला त्याची दखल घेत बुधवार रोजी सकाळी भागवत माळी व ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास वाघ यांनी नांदुर घाट पोलीस चौकी येथे येऊन जमादार मुकुंद ढाकणे व पत्रकार श्रीकांत राजे जाधव यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले. यावेळी उपसरपंच सुरेश हंगे प्रदीप दादा जाधव सतीशरावजी शिंदे उपस्थित होते.

COMMENTS