प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील 13 हि ठाणेदारांना जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणारांची अँटिजन टेस्ट करण्याचे आदेश दिले असुन आज हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बळीराम बंदखडके यांनी बळसोंड ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या सहाय्याने बळसोंड येथील बायपासवर सदर मोहीम राबविली यावेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 104 वाहनधारकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली असुन यामध्ये 5 जन कोरोना पाँझीटिव असल्याचे समोर आले असुन त्यांना कोरोना केअर सेंटर मध्ये भरती करण्यात आले आहे.
कोरोना महामारीचा फैलाव रोकण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत येणाऱ्या मोठ्या गावात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. बळसोंड बायपासवर आज सदर मोहिम राबविण्यात आली. यावेळी अतिरीक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, ग्रामीण चे ठाणेदार बंदखडके, बळसोंड चे सरपंच शैलेश जैस्वाल, उपसरपंच पप्पु चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुमित घिके यांच्या सह ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती
नागरिकांनी मास्क, सेनिटायझर चा वापर करावा तसेच विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आव्हान ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार बळीराम बंदखडके यांनी केले आहे. तसेच वेळेच्या आत दुकाने बंद न केल्यास कारवाई करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.
*बाळापुर पोलिसांकडुन ही अँटीजन मोहीम*
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रवि हूंडेकर यांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या मदतीने बाळापुर येथे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांची धरपकड करून कोवीड अँटिजन टेस्ट करण्यात आली. या मोहिमेने विनाकारण रस्त्यावर फिरणारांचे चांगले च धाबे दणाणले आहेत.

COMMENTS