कामारी येथिल रहिवाशी असलेले #हभप_व्यंकटेश_महाराज_कामारीकर यांच आज दुपारी नांदेड येथे निधन झाल, महाराजांच्या पुढाकारातुन हदगाव हिमायतनगर ताल...
कामारी येथिल रहिवाशी असलेले #हभप_व्यंकटेश_महाराज_कामारीकर यांच आज दुपारी नांदेड येथे निधन झाल, महाराजांच्या पुढाकारातुन हदगाव हिमायतनगर तालुक्यात हरी भक्त पारायण, ज्ञानेश्वरी, पारायण, भग्वदगिता पारायण, आदी धार्मिक कार्यक्रम होत असत, मराठवाडा, सिमावर्ती तेलंगाना, विदर्भात आध्यात्मीक वारकरी गुरू म्हणुन परीचित होते. त्यांचेशी अनेक वारकरी भक्त, शिष्यगण जोडले गेले होते, त्यांच्या जाण्याने धार्मिक कार्यक्रमातुन, आध्यात्म विषयक ज्ञानामृत देणारा गुरूवर्य गेल्याने समाज जागृती करणारांची पोकळी निर्माण झाली आहे, सुमधुर पहाडी आवाजाने सप्ताह, कलशोरोहन कार्यक्रम भरभरून वाटायचे, आता हा आवाज कायमचा वैकुंठवाशी झाला आहे. त्यांचेवर ७:०० वाजता कोविड -१९ चे नियम पाळत कामारी येथिल शेतात अंत्यसंस्कार होतील अस सांगण्यात येते.
#भावपुर्ण_श्रध्दांजली
🌺🌺🌺

COMMENTS