नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नरसी हि सद्या ग्रामीण भागाची महत्त्वाचे बाजार पेठेचे ठिकाण झाले आहे यामुळे नरसी ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक 21एप्रिल 2021 च्या मध्यरात्री पासुन 26 एप्रिल च्या पहाटे पर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात येत असल्याची नरसी ग्रामपंचायत चे सरपंच गजानन पाटील भिलवंङे यांनी व्यक्त केले आहे.या जनता कर्फ्यु मध्ये विनाकारण कोणी फिरत असेल तर त्या व्यक्तीची कोरोणा टेस्ट करण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हात कोरोना माहामारीने थैमान घातले आहे,जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासन सर्वोत्तम नियम बंधने टाकून सुद्धा काही जन विनाकारणच नरसी शहरात फिरत आहेत.तरी या जनता कर्फ्य मध्ये मेडिकल व काही महत्त्वाचे असेल तरंच नागरिकांनी बाहेर यावे हे कडक जनता कर्फ्यु आहे असे आवाहण नरसी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच गजानंन ऊर्फ (पप्पु) पाटील भिलवंडे यानी केले आहे.

COMMENTS