नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना महामारीचे प्रमाण वाढत असल्याने कोरोना रूग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन नायगांव नगरपंचायतीच्या वतीने दि.21एप्रिल बुधवार ते 25 एप्रिल 2021 रविवार पर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे नगरपंचायत प्रशासनाने जनतेसाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने सुजाण नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नायगांव नगर पंचायत च्या वतीने कोवीड १९ ची परिस्थिती लक्षात घेवून कोरोनाचे प्रमाण कमी होण्यासाठी २१ एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ पर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याचा जनहितार्थ मोठा निर्णय घेतला आहे या काळात फक्त दवाखाने,मेडीकल स्टोअर्स व वैद्यकीय सेवा चालू असतील तर हॉटेल, भाजीपाला,फळे,मिठाई यासह बाकीचे सर्व दुकाने बंद राहतील तसेच नगर पंचायतच्या वतीने लागू करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या जनता कर्फ्यु (संचारबंदी) या काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये व बाहेर गावातील लोकांनी नायगांव शहरात येवू नये असे आवाहन करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बेकायदा जमाव व कलम १४४ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नायगांव नगर पंचायत चे मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS