धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद येथील महाराष्ट्र नवनिर्मान सेने चे माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रय कावड़े यांच्या वतीने धर्माबाद येथील कोविड केअर सेन्टर येथे ऑक्सीजन बेड व वेन्टीलेटर बेड उपलब्ध करुन द्यावे. ह्या विषयी निवेदन देण्यात आले.ह्या प्रसंगी मा. तहसीलदार साहेबांनी धर्माबाद कोविड केअर सेन्टर येथे ऑक्सीजन बेड उपलब्ध असल्याची माहीती दिली व वेन्टीलेटर ची मागणी मा.जिल्हाअधिकारी साहेंबाकड़े करणार असल्याचे आश्वासन त्यानी दिले आणि साहेबांनी ते मागणी लवकर करुन धर्माबाद येथील कोविड केअर सेन्टर येथे वेन्टीलेटर बेड ची ही भर टाकुन धर्माबाद शहर व ग्रामीण भागातील रुग्णानां उपयुक्त अशी सेवा मिळेल व धर्माबाद येथील पेशेन्टला नांदेड जाण्याची वेळ येणार नाही, असे ही ते म्हणाले. ह्यावेळी
आकाश लोसरवार, विजय इब्तेवार व संतोष चित्ते सोबत महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.

COMMENTS