नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
सबंध जगभरासह आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे,कोरोना लसीचा तुटवडा, राज्य व केंद्र सरकारामधील लसीवरून चाललेले राजकारण,हॉस्पिटलमधील अपुरी कॉटक्षमता लक्षात घेता ग्रामीण भागातील त्याचबरोबर शहरातील सामान्य नागरिकांना आणखी एकदा जीवघेण्या लॉकडाऊनला सामोरे जाण्यापेक्षा जनतेमध्ये कोरोना संबंधात जनजागृती व्हावी,शारीरिक अंतर बाळगावे,मास्क आणि सॅनिटायजरचा सातत्याने वापर करावा, साबणाने स्वछ हात धुवावे या संदर्भात आज मुखेड तालुक्यातील आंबुलगा(बु) येथे एसएफआय आणि डीवायएफआयच्या वतीने आठशे मास्क आणि वीस लिटर सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले ही मोहीम तीन दिवस राबविण्यात येणार आहे यामध्ये एका परिवारात जेवढे सदस्य तेवढे मास्क वाटप करण्यात येत आहे यावेळी एसएफआय राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड,माधव देशटवाड, शंकर बादावाड,सुधाकर कांबळे,अजीज कुरेशी,माणिक गोनशेटवाड,पत्रकार पवन जगडमवार, अंबादास कांबळे,शंकर येरगे, शंकर मंत्री,प्रविण कल्याणपाड,माधव कलेटवाड,संजय गडमवाड आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS