जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी परिसरात एका प्रेमी युगलाने एकाच दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजता उघडकिस आली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गुंडलवाडी येथील युवक अजय केशव डूकरे याचे औंढा तालुक्यातील राजदरी येथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेम जमले होते. सदर अल्पवयीन मुलीचे वडिल गुंडलवाडी येथे सालदार म्हणुन काम करीत होते. मयत युवक डुकरे हा परभणी येथे सैनिक शाळेत बारावी वर्गात शिक्षण घेत होता. सध्या कोरोनामुळे सुट्टी असल्याने मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. यावेळी या दोघांचे प्रेम जुळले होते. तर सदर मुलीचा विवाह दुसऱ्या मुलासोबत जमल्याने मुलीचे कुटूंब शुक्रवारी त्यांच्या मुळगावी राजदरी येथे जाणार होते व तेथे राहूण मुलीच्या लग्नाची तयारी करणार होते. मात्र यापुर्वीच गुरूवारी रात्री सदर प्रेमी युगलाने गुंडलवाडी शिवारात शेषराव डूकरे यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला एकाच दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. काही शेतकरी शुक्रवारी सकाळी शेतात जात असताना सदर आत्महत्या चा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रवि हूंडेकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शेषराव डूकरे यांच्या खबरीवरून आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात अकस्मात म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास बाळापुर पोलिस करीत आहेत.

COMMENTS