प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल गोपिनवार यांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या सहाय्याने
कोरोना महामारीचा फैलाव रोकण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूंदा पोलिस ठाण्याचे हद्दीत येणाऱ्या मोठ्या बाजार पेठेच्या गावात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना चे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असुन कोरोना चा प्रसार रोकण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर बंधने घालने आवश्यक असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी हिंगोली शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणारांची अँटिजन टेस्ट सुरू केल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या वाहणधारकांची संख्या कमी झाली आहे. पोलिस अधिक्षक यांच्या आदेशावरून कुरूंदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल गोपीनवार यांनी सदर मोहीम कुरूंदा येथे राबविण्यास सुरुवात केली आहे. कुरूंदा पोलिस ठाण्याचे हद्दीत एकुण 67 गावांचा समावेश असुन करुंदा, शिरडशहापुर, गिरगाव, चोंढी रेल्वे स्टेशन आदी गावे मोठया बाजारपेठेची असल्याने नागरिकांची वर्दळ असते. या गावांमध्ये विनाकारण लाँकडाऊन मध्ये नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने कुरूंदा चे ठाणेदार सुनिल गोपिनवार यांनी आज कुरूंदा येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या सहाय्याने रस्त्यावर विनाकारण फिरणारे 55 नागरिकांचीकोविड अँटिजन टेस्ट केली असुन टेस्ट पाँझीटिव येणाऱ्या नागरिकांना तात्काळ काँरंटाईन सेंटरला पाठविण्यात येत आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी हिंगोली शहरात सदर मोहिम सुरू केली होती. यानंतर आता सर्वच ठाण्याच्या हद्दीत सदर मोहीम पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मास्क, सेनिटायझर चा वापर करावा तसेच विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आव्हान कुरूंदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल.गोपिनवार यांनी केले आहे. तसेच वेळेच्या आत दुकाने बंद न केल्यास कारवाई करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.

COMMENTS