प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालूक्यातील गोजेगाव येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक वैजेनाथ मुंढे यांनी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी अंगिकारावे असे प्रतिपादन केले.
गोजेगाव येथे आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहूणे म्हणुन औंढानागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक वैजेनाथ मुंढे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सांगळे, सरपंच गंगाधर खिल्लारे, उपसरपंच सुभाष सांगळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव गोरखनाथ खिल्लारे, जिल्हा उपाध्यक्ष पंडित खिल्लारे, यांची उपस्थिती होती. सध्या सर्वत्र कोरोना महामारीचा प्रसार वाढत असल्याने शासनाने जयंती, सण, उत्सवावर काही निर्बंध लावले आहेत. प्रशासनाच्या निर्बंधाची औंढा पोलिस ठाण्याचे हद्दीतील गावात कडक अमलबजावणी होण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ चे पोलिस निरिक्षक मुंढे यांनी गावांना भेटी देऊन गावातील पोलिस पाटिल, सरपंच, जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्याशी पोलिस निरिक्षक मुंढे यांनी चर्चा केली होती. ज्याचे पालन करीत नागरिकांनी, आंबेडकर जयंती, राम नवमी, रमजान महिना साजरा करीत आहेत. गोजेगाव येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून जयंती निमित्ताने डाँ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना मुंढे म्हणाले कि बाबासाहेबांनी लिहीलेल्या संविधानाचा सर्वांनी आदर केला पाहिजे, बाबासाहेबांचे विचार युवकांनी अंगिकारले पाहिजे असे सांगितले.यावेळी गोजेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, बौध्द समाज बांधवांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम सोशल डिस्टसिंग, मास्क, सेनिटायझर चा उपयोग करून संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन भिमक्रांतीकारी मित्रमंडळाच्या वतिने करण्यात आले होते.

COMMENTS