नांदेड:नांदेडच्या 'सिडको-हडको' भागातील आंबेडकरवादी चळवळीमधील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपेंद्र शंकर...
नांदेड:नांदेडच्या 'सिडको-हडको' भागातील आंबेडकरवादी चळवळीमधील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपेंद्र शंकरराव तायडे (वय-४९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने २२ एप्रिल रोजी सायंकाळी उपचारादरम्यान, नवीन नांदेड परिसरातील एका खाजगी रूग्णालयात निधन झाले. दिवंगत उपेंद्र तायडे यांच्या पार्थिव देहावर गुरूवारी रात्री उशिरा 'सिडको'तील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, एक भाऊ, भावजय, पुतण्या व पुतनी असा परिवार आहे. प्रत्येक सामाजिक कार्यात अहोरात्र हिरीरीने पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र तायडे यांच्या अकाली निधनाबद्दल नांदेड शहर व नवीन नांदेड परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS