सोनपेठ/प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून कमी वजन तसेच गरोदर माता यांना त्यांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रत्नापुर येथील संक...
सोनपेठ/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून कमी वजन तसेच गरोदर माता यांना त्यांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रत्नापुर येथील संकल्प मानव विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून कमी वजनातील बालकांना तीळ,गूळ,शेंगदाणे यासह इतर साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.यासाठी संस्थेचे मुख्य मार्गदर्शक सुधाकर क्षीरसागर यांच्या संकल्पेतून कुपोषणमुक्त बालके करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी संस्थेचे समुदाय संघटक वैजनाथ कसबे,बाबासाहेब कसबे,बालासाहेब खोपे,सपना राठोड,पूजा जाधव,अरुणा आठवले,विठ्ठल साळवे,राजू साठे,आदींची उपस्थिती होती.

COMMENTS